२०१६ च्या पद्म पुरस्कारासाठी गृहमंत्रालयाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून नामांकने मागवली आहेत. याबाबत १५ सप्टेंबर २०१५ पर्यंत अर्ज पाठवता येतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
एखाद्या क्षेत्रातील योगदान, कार्य याच्या आधारे या पुरस्कारासाठी गौरवले जाते. कला, साहित्य, शिक्षण, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योग, नागरी सेवा या क्षेत्रांतील योगदानासाठी पुरस्कार दिले जातात. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर याचा तपशील उपलब्ध आहे. जास्तीत जास्त ८०० शब्दांमध्ये नामांकन पाठवायचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांखेरीज इतर जण यासाठी पात्र असतील. सर्वसाधारणपणे राज्य सरकारे, केंद्र शासित प्रदेश तसेच केंद्राच्या मंत्रालयाकडून पुरस्कार मागवले जातात. पद्म समितीपुढे हे अर्ज ठेवले जातील.