News Flash

“केंद्रात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता”, तुषार गांधींची मोदी सरकारवर टीका

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा तुकडे-तुकडे गँगचा उल्लेख होऊ लागला आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात तुकडे-तुकडे गँग सत्तेत आहे असा टोला लगावला आहे. तुषार गांधी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यामध्ये त्यांनी “तुकडे-तुकडे गँग सध्या केंद्रात सत्तेत आहे” असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. अमित शाह यांनी तुकडे-तुकडे गँगला अद्दल घडवा असं आवाहन गुरुवारी केलं होतं.

काय म्हणाले होते अमित शाह ?
अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना तुकडे-तुकडे गँगला अद्दल घडवा असं आवाहन दिल्लीतील जनतेला केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग दिल्लीत अशांतता पसरवत असून, तिला अद्दल घडवा”.

‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे,’’ असे अमित शाह म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:18 pm

Web Title: great grandson of mahatma gandhi tushar gandhi modi government tukde tukde gang sgy 87
Next Stories
1 बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या
2 Video: पाक सैन्याला पळवणाऱ्या MIG-27 फायटर जेटचा इतिहास आणि वैशिष्ट्य
3 कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
Just Now!
X