कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यास आज पाकिस्तानात अटक करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, दहा वर्षे शोधल्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या तथाकथित मास्टरमाइंडला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला शोधण्यासाठी मागिल दोन वर्षात प्रचंड दबाब टाकण्यात आला होता.

हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. हाफिजला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांतातील पोलिसांनी हाफिज सईद विरोधात दहशतवादाला पैसा पुरवणे आणि आर्थिक गैरव्यवहार या आरोपांखाली एफआयआर दाखल केला होता. त्याचवेळी त्याला अटक होणार अशी चर्चा होती.