22 September 2020

News Flash

साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने केला बलात्कार

घरी आल्यावर वडिलांनी तिला कारण विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. 'स्कूलबसवाले भय्या माझे कपडे काढतात' असे तिने वडिलांना सांगितले.

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडात साडेतीन वर्षांच्या चिमुरडवीर स्कूलबस चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

खासगी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या साडे तीन वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यात तिने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून परतल्यावर घरी येऊन रडत होती. माझे पती तिला घ्यायला गेले होते. बसमधून उतरल्यावर वडिलांना पाहताच ती रडू लागली. घरी आल्यावर वडिलांनी तिला कारण विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ‘स्कूलबसवाले भय्या माझे कपडे काढतात’ असे तिने वडिलांना सांगितले. कामावरुन घरी परतल्यावर पतीने मला याबाबतची माहिती दिली, असे महिलेने म्हटले आहे.

मी देखील मुलीला विचारले असता तिने सर्व घटनाक्रम सांगितला. ती बोलत असताना मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. त्यावेळी ती घाबरली. व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तर भय्या मला मारेल, असे तिने सांगितल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

मुलीच्या आईवडिलांनी या प्रकाराची शाळा प्रशासनालाही माहिती दिली. प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले. पण काहीच कारवाई केली नाही. शेवटी आम्ही पोलीस ठाण्यात आलो, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी स्कूलबस चालकाविरोधात बलात्कार तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बसचालक अद्याप फरार आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:46 am

Web Title: greater noida three year old girl sexually assaulted by school bus driver
Next Stories
1 न्यायालयाचा निकाल सकारात्मक : जेटली
2 ‘सीबीआय’ला वेसण
3 दाती महाराजविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, CBI कडून तपास सुरू
Just Now!
X