08 March 2021

News Flash

धक्कादायक! वडिलांनी केला होता बलात्कार; १२ वर्षांच्या मुलीनं दिला मुलाला जन्म

आईवडिलांच्या घटस्फोटानंतर ही मुलगी आपल्या आईकडे राहत होती. मात्र ती आपल्या वडिलांना भेटायला त्यांच्या घरी येत असे. त्यावेळी वडिल तिच्यावर बलात्कार करत असल्याचे समोर आले

देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढत असून नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी पोटच्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती राहिली. इतकेच नाही तर या मुलीने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी एका मुलाला जन्मही दिला. त्यामुळे हे नराधम वडिल एकाचवेळी पुन्हा वडिल आणि आजोबा झाले आहेत. ही धक्कादायक घटना गुजरातमधील सुरत येथे घडली आहे.

आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली होती. या मुलीच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून मुलीच्या आईने आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार काक्रापड पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत ही तक्रार दाखल करुन घेतली आहे. या मुलीचे वडिल राहत असलेल्या तापीमधील सोनगढ येथे हे प्रकरण सोपवण्यात आले. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर ही मुलगी आपल्या आईकडे राहत होती. मात्र ती आपल्या वडिलांना भेटायला त्यांच्या घरी येत असे. त्यावेळी वडिल तिच्यावर बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे.

नुकत्याच जन्म झालेल्या बाळाची आणि अल्पवयीन मुलीची तब्येत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या नवजात अर्भकाचे वजन २.८ किलो असल्याचे डॉक्टर म्हणाले. नवजात बाळाची आई अल्पवयीन असल्याने या बाळाला अनाथाश्रमात ठेवण्यात येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे १२ वर्षीय ही मुलगी आपले पुढील शिक्षण योग्य पद्धतीने करु शकेल. तर या मुलीला आणि बाळाला आवश्यक तो पाठिंबा देण्यासाठी एका हिरेव्यापाराने तयारी दर्शवली असल्याचे या मुलीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांवर कारवाई होऊन त्यांना योग्य ती शिक्षा होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 5:29 pm

Web Title: gujarat 12 year old girl raped by father delivers baby boy
Next Stories
1 ‘मोदी सरकारला धडा शिकवणार’; डीएमकेच्या अध्यक्षपदी विराजमान होताच स्टालिन गरजले
2 पत्नीच्या हत्येप्रकरणी अनिवासी भारतीयाला २८ वर्षांचा तुरुंगवास
3 Kerala Floods : राहुल गांधींनी स्वतःचे हेलिकॉप्टर थांबवले; एअर अॅम्ब्युलन्सला दिले प्राधान्य
Just Now!
X