26 September 2020

News Flash

बलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी, ३० एप्रिलला शिक्षेचा फैसला

नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय ३० एप्रिल रोजी निर्णय देणार आहे.

संग्रहित छायाचित्र

गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय ३० एप्रिल रोजी निर्णय देणार आहे.

सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण सुमारे ११ वर्षे जुने होते. या प्रकरणात कोर्टात ५३ जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता.  तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी नारायण साईला अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:38 pm

Web Title: gujarat rape case narayan sai surat sessions court sentence to be pronounced on april 30
Next Stories
1 मसाला व्यापाऱ्याने कुटुंबाच्या मदतीने घडवले श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट
2 चीन नमलं, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केलं मान्य
3 वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदींकडून उमेदवारी अर्ज दाखल
Just Now!
X