20 January 2018

News Flash

गुजरात विधानसभा निवडणुक: नरेंद्र मोदी विजयी, पुन्हा मुख्यमंत्री होणार तर हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता

गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असुन, भाजपने आघाडी घेतलेली आहे. तर हिमाचलप्रदेशातील सत्ता भाजपकडून काँग्रसच्या हाती गेल्याची चिन्हे दिसू लागली आहेत हिमाचलप्रदेशात

नवी दिल्ली | Updated: December 20, 2012 12:24 PM

गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असुन, भाजपने आघाडी घेतलेली आहे. तर हिमाचलप्रदेशातील सत्ता भाजपकडून काँग्रसच्या हाती गेल्याची चिन्हे दिसू लागली आहेत हिमाचलप्रदेशात आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा अर्धा मार्ग काँग्रेसने गाठल्याचे चित्र निकालांवरून दिसत आहे. गुजरातमध्ये मणिपुरमधून नरेंद्र मोदींनी काँग्रेस उमेदवार श्वेता भट्ट यांच्यावर मात करत विजय प्राप्त केला आहे. मतमोजणी निकाल पाहता भाजपला गेल्या निवडणुकांपेक्षा अपेक्षित जागांवर आघाडी घेण्यात काही प्रमाणात अपयश आले आहे. मागील २००७ निवडणुकांमध्ये गुजरातच्या १८२ जागांच्या निवडणुकीच्या शर्यतीत भाजपला ११७ तर काँग्रेसला ५९ जागांवर यश मिळाले होते.  
हिमाचलप्रदेश निवडणुकांच्या निकालात काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली परंतु सरतेशेवटी काँग्रेसने आघाडी घेत हिमाचलप्रदेश निवडणुकांत बहुमताचा आकडा गाठला आहे.

First Published on December 20, 2012 12:24 pm

Web Title: gujrat election narendra modi wins himachal pradesh congress ruled
  1. No Comments.