गोव्यामध्ये मात्र करोनाप्रतिबंधात्मक म्हणून वापर

करोना संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट  वापरण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी धोक्याचा इशारा दिला आहे. इव्हरमेक्टिन हे तोंडावाटे देण्याचे औषध असून परोपजीवी जंतूंना अटकाव करणारे ते करोनावर वापरण्यात येत आहे.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, करोनावर उपचार करताना सुरक्षितता व परिणामकारकता महत्त्वाची आहे. कोविड १९ विषाणू संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट वापरणे योग्य नाही. या औषधाची निर्मिती करणाऱ्या एमएसडी व मर्क या कंपन्यांनाही याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. इव्हरमेक्टिनचा करोना १९ विषाणू संसर्गावर वापर करताना त्याबाबत झालेले अभ्यास विचारात घेणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या विश्लेषणानुसार या औषधाचा करोनावर उपयोग होत असल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. शिवाय सुरक्षिततेबाबतच्या माहितीचाही अभाव आहे. इव्हरमेक्टिन या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा देण्याची दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.

मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की, या औषधाने रुग्णास  रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत. गोवा सरकारने करोनावर इव्हरमेक्टीन औषधाच्या वापरास प्रतिबंधात्मक औषध म्हणून मंजुरी दिली असून प्रौढांमध्ये हे औषध वापरण्यास सांगितले आहे.

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वाजित राणे यांनी सांगितले की, ब्रिटन, इटली, स्पेन, जपान या देशांच्या तज्ज्ञ पथकांनी या औषधाच्या वापरास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पाच दिवस बारा ग्रॅमची एक गोळी या प्रमाणे या गोळ्या १८ वर्षांवरील व्यक्तींना देण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गृह विलगीकरणात असलेल्या व लक्षणहीन रुग्णांवर हे औषध ताप आटोक्यात आणण्यासाठी वापरण्याचे मार्गदर्शक तत्त्व जारी केले होते.

डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे की, इव्हरमेक्टिन या औषधाबाबत चर्चा सुरू आहे. त्याला विशिष्ट मात्रांमध्ये वापरण्यास परवानगी आहे पण ते परोपजीवी जंतू मारणारे औषध आहे. अमेरिकन जर्नल ऑफ थेरपटिक्स या नियतकालिकाने इव्हरमेक्टिन हे औषध करोनाची साथ आटोक्यात आणू शकते असे म्हटले होते. त्यासाठी केलेल्या चाचण्यांनंतर क्रिटिकल केअर अलायन्स या वैद्यकीय गटाचे अध्यक्ष पिअर कोरी यांनी सांगितले की, इव्हरमेक्टिन या औषधाबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. या औषधाने कोविड मृत्यू दर कमी होऊन रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते असा दावा करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच मलेरियाविरोधी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन व रेमडेसिविर या औषधांचा अनावश्यक वापर चुकीचा असल्याचे म्हटले होते. पण भारतात करोना उपचारात रेमडेसिविरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.