पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर भागात तसेच ओदीशामध्ये पावसाची संततधार सुरूच असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. मात्र ओदीशातील काही भागातील नद्यांची जलपातळी कमी होत असल्याचीही चिन्हे आहेत. दरम्यान, ओदीशामध्ये पावसाच्या वळींची संख्या १९ वर पोहोचली आहे.
गेले काही दिवस भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. ओदीशा राज्यातील गंजम जिल्हा आणि भुवनेश्वर परिसराला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून सुमारे एक लाख लोक यामुळे बाधित झाले आहेत. याच भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यातच १९ जणांचा बळी गेला आहे. सुवर्णरेखा आणि जलाका या नद्यांच्या जलपातळीतील वाढ सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्याऩ, आंध्र प्रदेशातही पावसाने थमान घातले असून तेथे पावसामुळे ४२ जणांना जीव गमवावा लागला आह़े  तर ८४ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आल़े