हिमाचल प्रदेशात तुफान पावसाने कहर केला आहे. जनजीवव पूर्णपणे विस्कळीत झाले असून मोठ्याप्रमाणात नुकसानही झाले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याची देखील माहिती आहे. शिवाय राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत या पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण वाहून गेले आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणचे मार्ग व पूल वाहून गेले असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. पाच राष्ट्रीय महामार्गांसह ३०० पेक्षा अधिक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत.

येथील बंदला येथे भींत अंगावर कोसळल्याने आजोबा आणि नातावाचा मृत्यू झाला. तर शिमला येथे भूस्खलनामुळे चारजण दबल्या गेले आहेत. कुल्लू येथे एकजण वाहून गेला आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी घरांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आहे. रेल्व रूळा पाण्याखील गेल्याने रेल्वे सेवा देखील ठप्प आहे.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. रावीसह अन्य नद्या दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना घर सोडावे लागत आहे. विद्यूत यंत्रणेत बिघाड उद्भवला आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यात कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.