Advertisement

हिंदू महिलेनं थांबवला मुस्लीम प्रियकराचा निकाह; सर्वांसमोर वराला घेऊन पसार

हिंदू महिलेने मुस्लीम प्रियकराचा निकाह थांबवून त्याच्यासोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे

हिंदू महिलेने मुस्लीम प्रियकराचा निकाह थांबवून त्याच्यासोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे ही घटना घडली आहे. आपल्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या लग्नात हिंदू महिला शिरली आणि निकाह थांबवला. यानंतर प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी त्याला घेऊन ती पुन्हा दिल्लीत पोहोचली.

मंगळवारी २२ वर्षीय संतोष कुमारी मंडवर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पोहोचली होती. अजमल अहमद या आपल्या २५ वर्षीय प्रियकराचा शोध घेत ती दिल्लीतून आपल्या मित्रांसोबत पोहोचली होती. हेअरड्रेसर असणाऱ्या अजमलसोबत सलूनमध्ये तिची भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरुवात केली.

“काही दिवसांपूर्वी अजमल दिल्लीतून आपल्या घऱी आला होता. इथे त्याचं एक दुसऱ्या महिलेसोबत लग्न होणार होतं,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अजमलला पुन्हा दिल्लीला घेऊन जाण्यासाठी संतोष कुमारीला पोलिसांची मदत हवी होती. त्यानुसार आम्ही मदत केली असं पोलिसांनी सांगितलं आहे.

संतोष कुमारी विवाहमंडपात पोहोचली तेव्हा तिच्यासाबोत पोलिसांची एक टीमदेखील होती. निकाह थांबवून अजमलला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनाही याची माहिती मिळाली आणि तेदेखील पोलीस ठाण्यात पोहोचले. हिंदू महिलेची सुरक्षा करण्यासाठी आल्याचं ते सांगत होते. पण पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि यामध्ये जबरदस्तीचा कोणताही प्रकार नसल्याचं स्पष्ट केलं.

23
READ IN APP
X
X