जर्मनीचा सर्वात क्रूर हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ‘वुल्फस् लायर’ येथील वास्तव्यात शाकाहारी होता, असा दावा त्याचे अन्न तपासणाऱ्या मरगॉट वोल्क यांनी केला आहे. हिटलरला कुणी विष घालू नये यासाठी त्याचे अन्न तपासण्याचे काम श्रीमती वोल्क करीत होत्या, त्यासाठी हिटलरला दिला जाणारा प्रत्येक अन्नपदार्थ त्या चाखून पाहत असत.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्यावेळी जर्मन नागरिक असलेल्या वोल्क हिच्या पतीला लढायला पाठवण्यात आले व तिला शुझाफेल याने हिटलरच्या पूर्व आघाडीवरील मुख्यालयात नेले. सध्या हे ठिकाण पोलंडमध्ये ‘वुल्फस् लायर’ नावाने प्रसिद्ध आहे. तिथे ती हिटलरच्या अन्नाचे परीक्षण करणाऱ्या स्त्रियांमध्ये सामील झाली होती, असे ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले आहे. साधारण अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आम्ही अन्नाची चव घेत असू व त्यानंतर ते अन्न हिटलरला दिले जात असे. हिटलरला दिले जाणारे अन्न हे शाकाहारी असायचे. त्यात शतावरी, मिरच्या, वाटाणे, भात व सॅलड यांचा समावेश असायचा. हे सगळे अन्नपदार्थ एका ताटात व्यवस्थित वाढले जात असत. मांस मात्र त्यात नव्हते, त्याला मासे दिले गेल्याचेही आठवत नाही. त्याच्यासाठी अन्नपरीक्षण करताना भीती वाटायची व चुकून आपल्यालाच विषबाधा झाली तर आपण मरणार हे ठरलेले होते. आम्हाला जबरदस्ती ते अन्न खायला दिले जात असे. हिटलर हा आर्य वंशाचा होता, त्यामुळे तो अन्नातही पवित्रता पाळत असे. मांस न खाता त्याऐवजी नाझी बिन्स म्हणजे सोयाबीन सेवन करावे असे त्याच्या नियमावलीत लिहिले होते. १९४२ मध्ये हिटलरने जोसेफ गोबेल्सला असे सांगितले होते की, युद्ध जिंकल्यावर जर्मनीला शाकाहारी देश करण्याचा आपला इरादा आहे.हिटलरला मांसाहाराचा तिटकारा होता असे सांगितले जात असले तरी त्याचा खानसामा डायन ल्युकास याच्या मते त्याला भरलेले डुक्कर आवडत असे व तो इतर मांसाहारी पदार्थ खात असे. त्याच्या जेवणाच्या सवयीही विचित्र होत्या. तो फार भराभर जेवत असे. मध्येच बोटाची नखे कुरतडत असे. हिटलरने १९४१ ते नोव्हेंबर १९४४ असे ८०० दिवस वुल्फस् लायर येथे वास्तव्य केले होते.
काय होती हिटलरची दक्ष खाद्यभ्रमंती?  साधारण अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आम्ही अन्नाची चव घेत असू व त्यानंतर ते अन्न हिटलरला दिले जात असे. हिटलरला दिले जाणारे अन्न हे शाकाहारी असायचे. त्यात शतावरी, मिरच्या, वाटाणे, भात व सॅलड यांचा समावेश असायचा. हे सगळे अन्नपदार्थ एका ताटात व्यवस्थित वाढले जात असत. मांस मात्र त्यात नव्हते, त्याला मासे दिले गेल्याचेही आठवत नाही. त्याच्यासाठी अन्नपरीक्षण करताना भीती वाटायची व चुकून आपल्यालाच विषबाधा झाली तर आपण मरणार हे ठरलेले होते. आम्हाला जबरदस्ती ते अन्न खायला दिले जात असे
मरगॉट वोल्क

Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?
nazi battle of normandy the great battle for normandy german defeat in normandy
भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी