लेबनानची राजधानी बैरुटमध्ये झालेल्या महाभयंकर स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे . या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या स्फोटांच्या घटनांमुळे शेकडोजण जखमी झाले आहेत. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. हे स्फोट नेमका कसा झाला हे समजू शकलेलं नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बैरुत हादरलं. या ठिकाणी दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की त्यामुळे सगळ्या शहराला हादरे बसले.

पाहा व्हिडीओ

बैरुटमध्ये दोन महाभयंकर स्फोट झाले. १५ मिनिटांच्या आतच हे स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की संपूर्ण शहरातल्या घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले.

बैरुटमधल्या भारतीय दुतावासाने बैरुटमध्ये असलेल्या भारतीयांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाइन नंबर्सही देण्यात आले आहेत. घाबरुन जाऊ नका, शांत राहा असंही आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बैरुटमधल्या या स्फोटाचे विविध व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.