बायको आणि मुलांचे पालनपोषण करणे ही नवऱ्याची पहिली जबाबदारी आहे. त्यासाठी त्याने भीक मागावी, उधारी घ्यावी किंवा चोरी करावी असे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. द ट्रीब्युनने हे वृत्त दिले आहे.

न्यायाधीश एच.एस.मदन यांनी हा आदेश दिला. बायको आणि मुलांचा देखभाल खर्च देत नसल्याबद्दल याचिकाकर्त्याला तुरुंगात पाठवण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला त्याने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण इथेही न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

याचिकाकर्त्याने २०१५ साली देखभाल खर्चापोटीचे ९१ हजार रुपये थकविले होते. त्यावर भिवानी जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने १७ एप्रिल २०१५ रोजी त्याला १२ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्याने या विरोधात वरिष्ठ कोर्टात दाद मागितली पण उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.