महात्मा गांधीजींप्रमाणे मी देखील आंदोलनजीवी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी सोमवारी राज्यसभेत केलेल्या विधानावर चिदंबरम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीट करुन पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मला आंदोलनजीवी असल्याचा अभिमान आहे. महात्मा गांधी हे देखील एक आंदोलनजीवी होते” असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- इये ‘आंदोलन’जीवियें…

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “देशात नवी आंदोलनजीवी जमात अस्तित्वात आली आहे. हे आंदोलनजीवी लोक उठून-सुटून कुठल्याही आंदोलनांमध्ये सहभागी होत असतात. ते आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत, त्यामुळे जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं.”

आणखी वाचा- पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ शब्दावर अशोक चव्हाणांनी नोंदवला आक्षेप, म्हणाले…

मोदींच्या या वक्तव्याचा शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या संघटनांनी निषेध केला होता. पंतप्रधानांनी आंदोलनजीवी असं संबोधून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असं त्यांनी म्हटलं आहे.