इराकमधील अल-बलाद हवाईतळावर रात्री उशीरा क्षेपणास्त्र हल्ला झाला. ज्यामध्ये दोन अधिकाऱ्यांसह चार सैनिक गंभीर जखमी झाले. अल-बलाद हवाईतळ हे इरकामध्ये अमेरिकी सैन्य दलाचे प्रमुख तळ मानले जाते. या हल्ल्यानंतर देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की, जर इराण चर्चेसाठी तयार आहे तर मी बेजबादार नाही होऊ शकत, मात्र हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तर, अमेरिकेची परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी मात्र हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आज सांगितले की निर्बंध आणि विरोध प्रदर्शनांनी इराणला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. आता ते चर्चेसाठी मजबूर होतील. जर त्यांना खरोखरच चर्चा करायची असेल तर मी देखील बेजबाबदार नाही, मात्र हे संपूर्णपणे त्यांच्यावरच अबलंबून आहे. मात्र कोणत्याही आण्विक शस्त्राचा वापर नको आणि आपल्या विरोधकांना देखील मारू नये, असं ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे.

तर इराकमधील अमेरिकी सैन्याच्या हवाईतळावर झालेल्या हल्याबाबत अमेरिकेचे पराराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. इराकी हवाईतळावर झालेल्या आणखी एका क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती ऐकल्याने मी नाराज आहे. मी जखमींना लवकर बरे वाटावे याची प्रार्थना करतो. इराकच्या सरकारला या हल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन करतो, असं त्यांनी ट्विट केलं आहे.

इराकमधील अल-बलाद हवाईतळावर रात्री उशीरा क्षेपणास्त्र हल्ला झाला. ज्यामध्ये दोन अधिकाऱ्यांसह चार सैनिक गंभीर जखमी झाले. अल-बलाद हवाईतळ हे इरकामध्ये अमेरिकी हवाईदलाचे प्रमुख तळ मानले जाते. इराक आपल्या ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांना देखील या ठिकाणीच ठेवतो. या हल्ल्यात अमेरिकी सैन्याला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून इराण बरोबर तणाव वाढल्यापासून या ठिकाणाहून बहुतांश अमेरिकी सैन्य काढण्यात आलेले आहे. हल्ला करणारे क्षेपणास्त्र नेमके आले कुठून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणने आपले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर मागील आठवड्यात याच सैन्य तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.

अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारल्यापासून आखातात तणाव निर्माण झालेला  आहे.