26 September 2020

News Flash

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार इतकं काम दुसरं कोणीच केलं नाही : राजीव कुमार

राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी हे विधान केलं.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार.

कोणी मानावं किंवा मानू नये पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच चॅम्पिअन आहेत. त्यांच्या सरकारने सर्व बाबींकडे लक्ष दिलं आहे. मला वाटतं, शेतकऱ्यांसाठी सध्याच्या सरकार इतकं मोठ काम दुसऱ्या कोणत्याच सरकारनं केलेलं नाही, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

राजीव कुमार म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अद्यापपर्यंत एकाही सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या नव्हत्या, त्या या सरकारने स्विकारल्या. सरकारने शेतकऱ्यांसाठी १०.५० लाख कोटींची कर्जे दिली. राहुल गांधींच्या सरकारने त्यांचे काम करावे, इतर पक्ष त्यांची कामे करतील, असा सल्लाही त्यांनी राहुल यांना दिला.

राहुल गांधींनी शेतकरी कर्जमाफीवरुन एक ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले की, गुजरात आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना गाढ झोपेतून उठवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र, पंतप्रधान मोदी अद्यापही झोपलेले आहेत. आम्ही त्यांनाही जागं करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 4:19 pm

Web Title: i dont think any other govt has ever worked for farmers as much as the present govt is doing says niti aayog vice chairperson rajiv kumar
Next Stories
1 राम मंदिरासाठी अध्यादेश? काय सांगतो कायदा…
2 एअर फोर्सचे सामर्थ्य वाढवणाऱ्या जीसॅट-७ ए चे यशस्वी प्रक्षेपण
3 फेसबुकवरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार
Just Now!
X