मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. पण मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा टोला लगावला आहे. लोक मला ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हणतात, त्याचबरोबर मी ‘अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर’ही होतो, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि शेतकरी कर्जमाफीवरही भाष्य केले. स्वतंत्र अस्तित्व असलेल्या आरबीआयने केंद्र सरकारच्या सहकार्याने काम केले पाहिजे. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की आरबीआय आणि केंद्र सरकार यातून मार्ग काढतील आणि एकमेकांच्या सहकार्याने सुसंवादाने काम करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. मला वाटतं माझ्या पुस्तकातून (‘चेंजिंग इंडिया’) या सर्व बाबी स्पष्ट होतील. पत्रकार परिषदांना न घाबरता सामोरे जाणार पंतप्रधान मी होतो. मी नियमितपणे पत्रकारांना सामोरं जात. प्रत्येक विदेश दौऱ्यानंतर मी पत्रकार परिषदांचे आयोजन करत.

राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर त्यांनी समाधान व्यक्त केले. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा आम्हाला मान मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी आमच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wasnt the pm who was afraid of talking to the press says manmohan singh
First published on: 18-12-2018 at 21:50 IST