26 February 2021

News Flash

लवकरच भारताला दाखल होणार घातक ‘राफेल’ विमानांची दुसरी तुकडी

'राफेल' प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी इंडियन एअर फोर्सची टीम सध्या फ्रान्समध्ये...

या फायटर जेट्समुळे भारताची शत्रुवर आघात करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे. पण चीनला हे सत्य पचवणं जड जातंय. त्यामुळे चीनने आता पद्धतशीरपणे 'राफेल'ला कमी लेखण्याची मोहिम सुरु केली आहे.

‘राफेल’ फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी टू स्टार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंडियन एअर फोर्सची एक टीम सध्या फ्रान्समध्ये आहे. राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी पुढच्या काही आठवडयात अंबाला एअर बेसवर दाखल होईल. या घडामोडींशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली.

पुढच्या काही आठवडयात आणखी तीन ते चार राफेल विमाने भारतात दाखल होतील. चीन-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना, ४.५ जनरेशनच्या या फायटर विमानांमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे. अनेक विमानांचे काम एकटे राफेल करु शकते.

दर दोन महिन्यांच्या अंतराने तीन ते चार राफेल विमाने भारताकडे सोपवली जातील अशी IAF ला अपेक्षा आहे. जून १९९७ मध्ये रशियन सुखोई-३० विमाने इंडियन एअर फोर्सला मिळाली. त्यानंतर २३ वर्षांनी नवीन फायटर विमान एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झालं आहे. सध्या चीन बरोबर प्रचंड तणाव असलेल्या लडाख क्षेत्रातही, गरज पडल्यास राफेल विमानांचा वापर करण्यासाठी आयएएफ सज्ज आहे. चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे इथे लष्कर हाय-अलर्टवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:31 pm

Web Title: iaf team in france to review rafale project as india prepares to induct more jets dmp 82
Next Stories
1 Video: रहदारीच्या रस्त्यावर कार चालकाचा पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न; बोनेटला धरुन ठेवल्याने वाचले प्राण
2 धक्कादायक, दीड वर्षापासून पतीने पत्नीला शौचालयात ठेवले होते कोंडून
3 पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ; अमित शाहांच्या संपत्तीत घट – PMO
Just Now!
X