नेहमीच्या तापमानाला न वितळणारे आइस्क्रीम तयार करण्यात यश

आइस्क्रीम म्हटले, की ते बाहेरील हवेच्या संपर्कात येताच वितळते, मग ते चाटून खाण्याची गंमत राहत नाही. त्यामुळे आता जपानच्या वैज्ञानिकांनी त्यावर ‘कूल’ पर्याय शोधला असून न वितळणारे आइस्क्रीम तयार केले आहे. कोन किंवा भांडयात आइस्क्रीम घेताच ते वितळते, कारण बाहेरचे तापमान जास्त असते. त्यामुळे लोकांना ते घाईघाईत खावे लागते कारण ते घट्ट असताना चाटून खाण्याची मजा वेगळी असते. आता आइस्क्रीम वितळू नये म्हणून घाईने खाण्याची गरज पडणार नाही, कारण जपानमधील कानाझावा विद्यापीठातील संशोधकांनी आइस्क्रीमचा वितलन बिंदू वाढवला असून ते जास्त तापमानालाही वितळत नाही. त्यांनी न वितळणारे आइस्क्रीम तयार करण्यात यश मिळवले आहे. हे आइस्क्रीम कक्ष तापमानाला तीन तास वितळत नाही, असे दी टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. या आइस्क्रीमवर हेयर ड्रायरने गरम हवा पाच मिनिटे मारली तरी त्याचा आकार तसाच राहतो व ते वितळत नाही.

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

कशामुळे आइस्क्रीम वितळत नाही

जपानच्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या या आइस्क्रीममध्ये पॉलिफेनॉल द्रव मिसळलेला आहे, त्यामुळे तेल व पाणी अलग होत नाहीत; त्याचा परिणाम म्हणून हे आइस्क्रीम वितळत नाही. हे पॉलिफेनॉल स्ट्रॉबेरीजमधून काढलेले असून ते या आइस्क्रीममध्ये टाकले जाते. अर्थात हे रसायन कृत्रिम पद्धतीने मिळवलेले नाही. त्यामुळे त्याचा अपायही होत नाही. पॉलिफेनॉल द्रव मिसळल्याने आइस्क्रीम कडक राहते व बराच काळ वितळत नाही. हवामानाचा परिणाम रोखून जसेच्या तसे राहणारे हे आइस्क्रीम चॉकलेट, व्हॅनिला व स्ट्रॉबेरी स्वादात उपलब्ध आहे.

अपघाताने लागलेला शोध

पॉलिफेनॉलचा हा उपयोग खरेतर कधीच लक्षात येणारा नव्हता. २०११ मध्ये जपानमधील सुनामीमुळे मियागी परफेक्चर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संकटात होते, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळत नव्हती. त्यामुळे कनाझवा कंपनीने त्यांच्या संशोधन केंद्रातील शेफला नवीन कन्फेक्षनरी पदार्थात स्ट्रॉबेरीचा अर्क वापरून बघण्यास सांगितले. शेफनेही स्ट्रॉबेरीचा अर्क वापरला असता त्याला डेअरी क्रीम लगेच घट्ट झालेले दिसले. त्याचे कारण पॉलिफेनॉल हेच होते. त्यामुळे ते आइस्क्रीममध्ये वापरण्याचे ठरले, त्यातून न वितळणाऱ्या कनाझवा आइस्क्रीमची निर्मिती झाली.