सौदी अरेबियात आता सोशल मीडियावर सरकारवर टीका करणे किंवा सरकारची खिल्ली उडवणे महागात पडू शकते. ऑनलाइन टीका करून सार्वजनिक व्यवस्थेचे नुकसान पोहोचवल्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. यासाठी आरोपीला दंडासह ५ वर्षांचा कारावासही भोगावा लागेल.

सोशल मीडियावर सार्वजनिक व्यवस्था आणि धार्मिक मूल्यांची खिल्ली उडवणारा आशय लिहिला किंवा तसे उद्युक्त करणारे लिखाण असेल तर संबंधित व्यक्तीला सायबर गुन्ह्यातंर्गत दोषी ठरवले जाईल, असे सौदी अरेबियाने मंगळवारी जाहीर केले. त्याचबरोबर या गुन्ह्यासाठी आरोपीला ५ वर्षांची शिक्षा आणि ८,००,००० डॉलरचा दंडही भरावा लागेल.

अनेक लोक हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगत आहेत. आधीच सौदीचे राजे मोहम्मद बिन सुलतान यांच्यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याच्या आरोप आहे. सौदीमध्ये अनेक लोकांना सोशल मीडिया विशेषत: ट्विटरवर केलेल्या पोस्टमुळे शिक्षा भोगावी लागली आहे.