03 March 2021

News Flash

‘संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो’

भारत नक्कीच पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी व्यक्त केला आहे

संग्रहित छायाचित्र

जर भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर संदेश द्यायचा असेल तर भारत नक्कीच पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी व्यक्त केला आहे. नियंत्रण रेषा पार करुन दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व हुडा यांनीच केलं होतं. एएनआयशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, ‘२०१६ मध्ये दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याच निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता, ज्याला लष्कराने संमती दर्शवली अशी माहिती दिली’.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं व्हिडीओ फुटेज सार्वजनिक करण्यात आलं असून यामध्ये कशाप्रकारे लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे हे सविस्तर दिसत आहे. ड्रोन आणि युएव्हीच्या सहाय्याने हे फुटेज रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

डी एस हुडा यांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानी लष्कराची ठिकाणं जवळ असल्याने कारवाईदरम्यान हे खूप मोठं आव्हान होतं. रेकॉर्ड होत असलेलं सर्व फिड थेट दिल्लीलाही पोहोचत होतं. जवळपास सहा तासांसाठी ऑपरेशन सुरु होतं. मध्यरात्री पहिल्या टार्गेटला लक्ष्य करण्यात आलं तर सकाळी सव्वा सहा वाजता शेवटचं टार्गेट लक्ष्य कऱण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 3:29 pm

Web Title: if given chance can again do surgical strike says retired lt general ds hooda
Next Stories
1 १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक ! ‘हे’ क्विझ अॅप वापरताना सावधान
2 आम्हाला गृहित धरु नका, देवेगौडांचा काँग्रेसला सूचक इशारा
3 वर्षाअखेरपर्यंत भारताला स्विस बँकेतील काळ्या पैशाचा डेटा मिळेल – पियुष गोयल
Just Now!
X