24 February 2021

News Flash

‘राम मंदिराचा प्रश्न सर्वसहमतीने सोडवा, अन्यथा इतर पर्याय उपलब्ध’

राम मंदिरप्रश्नी लवकर तोडगा निघाला नाही तर आमच्यापुढे इतर पर्याय खुले आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे

निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत भगवान हनुमानाला दलित आदिवासी म्हटले होते.

राम मंदिराचा प्रश्न सर्वसहमतीने सुटावा ही आमची अपेक्षा आहे अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराची सुनावणी जानेवारीतच होईल असे म्हटले आहे. यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावरून विविध वक्तव्यं येण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिराचा प्रश्न सर्व सहमतीने सुटला पाहिजे असे आम्हाला वाटते आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र या प्रश्नी लवकर तोडगा निघाला नाही तर आमच्यापुढे इतर पर्याय खुले आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

राम मंदिर प्रश्नी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे. राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढण्याची मागणी होते आहे मात्र सध्या तरी अशी काही वेळ येईल असे वाटत नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने राम मंदिर प्रश्नी लवकर तोडगा काढावा. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटावा ही आमचीही इच्छा आहे. मात्र हा प्रश्न सुटला नाही तर इतर पर्याय आहेत ज्यांचा विचार करावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. इतर पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे मात्र ते काय आहेत हे स्पष्ट केलेले नाही.

याआधी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर टीका करत भाजपाला फक्त निवडणुका आल्यावरच राम मंदिराची आठवण येते असं म्हटलं आहे. तसंच भाजपावर टीकाही केली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांनी यावर बोलताना आम्हाला इतर पर्यायांचा विचार करतो आहोत सौहार्दाच्या मार्गाने तोडगा निघाला नाही तर इतर पर्यायांचा विचार करावा लागेल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 11:16 pm

Web Title: if ram temple issue cant be resolved through consensus there are other options says yogi adityanath
Next Stories
1 अमरिकेचं नागरिकत्व हा जन्मसिद्ध हक्क नाही – ट्रम्प यांचा प्रस्ताव
2 गोव्यात भाजपामध्ये बंडाचे संकेत, माजी मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
3 भारत तंत्रज्ञानात इतका सक्षम आहे की, जग आमच्याकडे मदत मागू इच्छिते : पंतप्रधान
Just Now!
X