15 November 2019

News Flash

आज निवडणुका झाल्यास नरेंद्र मोदी स्वबळावर सरकार नाही बनवू शकणार

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आणखी दोन दिवसांनी चार वर्ष पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-लोकनिती आणि सीएसडीएसने देशाचा मूड जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला.

पंतप्रदान नरेंद्र मोदी, संग्रहित छायाचित्र

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आणखी दोन दिवसांनी चार वर्ष पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-लोकनिती आणि सीएसडीएसने देशाचा मूड जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला. या सर्वेनुसार देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वात जास्त २७४ जागा मिळतील. म्हणजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात.

५४३ सदस्यांच्या लोकसभेत बहुमतांची २७२ ची मॅजिक फिगर गाठली तरी भाजपाला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही त्यांना मित्रपक्षांची गरज लागेल. ताज्या सर्वेनुसार काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला १६४ आणि अन्य पक्षांना १०५ जागा मिळतील. २०१४ च्या तुलनेत एनडीएच्या ४९ जागा कमी होतील तर संपुआच्या १०४ जागा वाढतील.

एकाबाजूला नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट होतेय तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींची लोकप्रियता वाढतेय. भाजपाची सर्वाधिक मदार उत्तर प्रदेशवर आहे. पण उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांची आघाडी झाल्यास भाजपाला मोठा फटका बसू शकतो असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. वर्षअखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे सत्तेचे स्वप्न भंग होऊ शकते. सध्याच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली असून काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये १५ टक्क्यांचे अंतर आहे.

आज निवडणूका झाल्यास मध्य प्रदेशात काँग्रेसला ४९ टक्के आणि भाजपाला ३४ टक्के मते मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. देशाचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणातून हे आकडे समोर आले आहेत.

मध्य प्रदेशच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन काँग्रेसने कमल नाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची धुरा संभाळतील. मध्य प्रदेशमध्ये ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

First Published on May 24, 2018 10:11 pm

Web Title: if today election held nda will get majority