डोक्यामध्ये टोप्या घातलेले काही हजार मुस्लिम पुरूष आणि बुरखा परिधान केलेल्या महिला नरेंद्र मोदींच्या प्रत्येक जाहिर सभेमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण भाजपने नुकत्याच ५००० हजार मुस्लिम टोप्या विकत घेतल्या आहेत. ‘भाजप’च्या जयपूर येथिल सभेसाठी हजर राहिलेल्या एका व्यक्तिने ही माहिती उघडकरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा धर्मनिर्पेक्षतेचा बुरखा फाडला आहे.
“जयपूर येथील सभेला सुरूवात होण्याआधी मुस्लिम टोप्या आणि बुरख्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आम्हाला देण्यात आलेल्या टोप्या आणि बुरखे घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली गेली. मला टोपी व माझ्या पत्नीली बुरखा मिळाला. सभेसाठी भाजपच्या जिल्हा प्रभाऱ्यांनी आमची मोफत प्रवासाची सोय केली होती.” असे कोट्टा येथून सभेला हजर राहिलेल्या शौकत अली यांनी सांगितले.
“जयपूरच्या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी निवड करण्यात आलेल्या मुस्लिमांना स्वत:च्या टोप्या व बुरखे घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. जयपूरच्या सभेसाठी प्रामुख्याने मौलवींना व पारंपारिक दाढ्या असलेल्या मुस्लिमांना प्राधान्य देण्यात आले होते.”, असे अजमेरचे रहिवासी गुलाम मोहम्मद यांनी सांगितले. मात्र, भाजपचे राजस्थान अल्पसंख्यांक कोषाध्यक्ष आमिन पठान यांनी ही बाब नाकारली आहे.
“मागील वर्षी दुडू येथील एका कार्यक्रमासाठी ‘संपुआ’ च्या अध्यक्षा सोनीया गांधी आल्या होत्या. सुरक्षेच्या कारणासाठी मुस्लिम महिलांना बुरखे काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. आम्ही मात्र जयपूर सभेमध्ये असे होऊ दिले नाही व टोप्या व बुरख्यांसाठी आग्रह देखील धरला नाही.” असे आमिन म्हणाले.
भाजपच्या जयपूर येथील सभेसाठी सुमारे तीन लाख लोक उपस्थित होते. सभेसाठी आलेल्या २५,००० मुस्लिमांपैकी ४००० महिलांनी बुरखा परिधान केला होता. अशी माहिती आमिन पठान यांनी दिली.