सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून केरळच्या अनेक जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला आहे. केरळच्या वेगवेगळया भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्कीमध्ये दरड कोसळून १० जणांचा, कन्नूरमध्ये दोघांचा आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला.

वायनाड, पलक्कड आणि कोझीकोडे जिल्ह्यातून प्रत्येकी एक व्यक्ति बेपत्ता आहे. इडुक्कीच्या आदीमाली शहरात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. स्थानिक जनता आणि पोलिसांनी दोघांना जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

वायनाड आणि कोझीकोडे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. एनडीआरएफची टीम कोझीकोडेला रवाना झाली आहे. इडुक्कीमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.