मध्य प्रदेशातील सुल्तान गड धबधब्याजवळ बुधवारी संध्याकाळी ११ युवकांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे अचानक पाण्याची पातळी वाढल्याने या युवकांचा बुडून मृत्यू झाला. ग्वालियरमधील शिवपुरी येथील सुल्तान गड हा लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. आज १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्याने मोठया संख्येने पर्यटक इथे आले होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

दरम्यान, अडकलेल्या ४० जणांना वाचवण्यात यश आले आहे. तत्पूर्वी ५ पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे येथे अडकून पडलेल्या सर्व ४५ जणांना वाचवण्यात आल्याचे शिवपुरीचे पोलीस अधीक्षक राजेश हिंगणकर यांनी सांगितले.