‘१ सेकंद’ आणि ‘हमारे टीम का बंदर’ ही वाक्ये वाल्मिकिंच्या रामायणात आपल्या सहसा ऐकायला मिळत नाही. पण नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्तानं अयोध्येच्या लक्ष्मण किला येथे आयोजित केलेल्या कलाकरांच्या रामलीलेलेमध्ये हा अनपेक्षित संवाद ऐकायला मिळाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर नऊ दिवस चालणारी रामलीला यावर्षी प्रेक्षकांशिवाय सादर केली जात आहे. १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ही रामलीला सोशल मीडिया आणि यू ट्यूबद्वारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे. भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी रामलीलामध्ये अंगदची भूमिका साकारली आहे. एका प्रसंगादरम्यान ‘सेकंड’ आणि ‘टीम’ सारख्या इंग्रजी शब्दांचा वापर त्यांच्याकडून झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मनोज तिवारी यांना बिहार निवडणुकीची घाई झाली आहे त्यामुळे त्यांच्याकडून हे शब्द वापरले गेले असतील, असं एका युजरनं म्हटलं आहे.

या रामलीलेमध्ये मनोज तिवारी यांच्यासोबत गोरखपूरचे खासदार रवि किशन यांनी भरतांची भूमिका साकारली आहे. तर विंदू दारा सिंग यांनी पुन्हा रामायणातील हुनमानाची भूमिका साकारण्याचे आव्हान पेललं आहे. अभिनेता रझा मुराद यांनी अहिरावण यांची आणि अभिनेता शाहबाज खान यांनी रावणाची भूमिका साकारली आहे. असरानी नारद मुनींच्या भूमिकेत आहेत, तर राकेश बेदी हे विभिषणाचे पात्र साकारले आहे.

रामलीलेसाठी अत्याधुनिक लाईट आणि चांगल्या अशा साऊन्डंची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून रामलीलेतील संवाद स्पष्टपणे प्रेक्षकांना ऐकायला मिळतील.