तबलिगी जमातीशी जोडल्या गेलेल्या ९६० परदेशी नागरिकांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. त्यांचे टुरिस्ट व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. तबलिगी जमातीशी संबंधित काही कार्यक्रमांमध्ये हे सगळे नागरिक सहभागी झाल्याचं समजलं होतं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

तबलिगी जमातीच्या मरकज या कार्यक्रमाचे दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे करोनाचा फैलाव वाढला.यामध्ये महाराष्ट्रातलेही काही जण होते. या प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रात करोनाचं संकट टळेपर्यंत खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केलं आहे. अशात आता या संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जो म्हणजे तबलिगी जमातीशी संबंधित असलेल्या ९६० विदेशी नागरिकांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं आहे.