स्वच्छ भारत मोहीम ही मोदी सरकारने सुरु केलेली आणि मागील चार वर्षांपासून राबलेली मोहीम आहे. ही मोहीम देशभरात राबवली जाते आहे. मागील पाच वर्षात स्वच्छ भारत मोहीमे अंतर्गत अनेक गावं आणि शहरं स्वच्छ केली जात असल्याचा दावाही केला जातो. मात्र ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी या मोहिमेवर टीका केली आहे. अयोध्या या ठिकाणी मुख्य बाजारातला एक व्हिडिओ ट्विट करत शेखर गुप्ता यांनी मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानावर शरसंधान केलं आहे.

पहा व्हिडिओ

शेखर गुप्ता म्हणतात, अयोध्येतील मुख्य बाजारपेठेत गायी आणि माकडं त्यांचं अन्न कचऱ्यात शोधत आहेत. त्यांना कचरा आणि प्लास्टिक मिश्रित अन्न खावं लागतं आहे. स्वच्छ भारत मोहीम अद्याप इथपर्यंत पोहचलेली नाही, असा खोचक ट्विट शेखर गुप्ता यांनी केला आहे.

 

मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवणाराच हा व्हिडिओ आहे. दिल्लीतच कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. आता या व्हिडिओला भाजपाकडून उत्तर दिले जाईल का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.