News Flash

उत्तर प्रदेशात पुन्हा तरुणीच्या छेडछाडीची घटना; विरोध करणाऱ्या वडिलांची आरोपींनी केली हत्या!

गुंडांनी लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी केली बेदम मारहाण

संग्रहित, प्रातिनिधीक छायाचित्र

हाथरसमध्ये घडलेल्या अमानुष प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात गुंडाराज ऐरणीवर आला आहे. याबाबत आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या बापाला छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. येथील देवरिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली होती. यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. यानंतर रागाने पेटलेल्या या आरोपी तरुणाने काही लोकांना घेऊन त्या मुलीच्या घरी पोहोचला. या लोकांकडे हत्यारं होती. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या वडिलांनी आपले प्राण सोडले.

याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेनंतर मुलीच्या गावात प्रचंड तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी ६ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांपैकी तीन जण प्रसिद्ध व्यक्ती आहेत.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या गुंडांनी गुरुवारी संध्याकाळी पीडित मुलीची छेड काढली. याबाबत मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाकडे तक्रार केली मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीच्या वडिलांसोबतच भांडायला लागला. त्यानंतर चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी त्याला थप्पड लगावली. यानंतर चवताळलेल्या आरोपी तरुणाने आपल्या सहकार्यांसह मुलीच्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

देवरियाचे पोलीस अधीक्षक श्रीपती मिश्रा म्हणाले, “आरोपींना आता ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पीडित कुटुंबाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आणखी एका तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 5:13 pm

Web Title: incident of molestation of a girl again in uttar pradesh accused killed to her father for opposing aau 85
Next Stories
1 बिहारमध्ये मतदान केंद्रावर हाणामारी, जवानांकडून हवेत गोळीबार
2 प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडियांविरोधात ३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, FIR दाखल
3 जागतिकीकरण महत्त्वाचं पण आत्मनिर्भर होणंही आवश्यक; IIT च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचा सल्ला
Just Now!
X