प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आता व्यक्तिगत पातळीवर अधिक सोपे झाले असून २०१६-१७ या वर्षांसाठी तुम्ही तुमचा कर किती आहे हे ऑनलाइन गणकयंत्राच्या मदतीने शोधून काढू शकाल. प्राप्तिकर खात्याने ही सुविधा दिली आहे. टॅक्स कॅलक्युलेटर हा ऑनलाइन प्रोग्रॅम असून तो प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने विवरणपत्र भरताना नेमका प्राप्तिकर किती हे समजणार आहे. करदायित्व समजण्यासाठी ही सोय केली आहे. मूलभूत माहिती व आकडे भरल्यानंतर तुम्हाला कराची रक्कम कळू शकेल. ६६६.्रल्लूेी३ं७्रल्ल्िरं.ॠ५.्रल्ल- या संकेतस्थळावर कराची रक्कम सांगणारा कॅलक्युलेटर उपलब्ध आहे. व्यक्तिगत पगारदार, एकत्र कुटुंब व इतर उत्पन्न स्रोत असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर १ अर्ज भरायचा आहे तर विभक्त हिंदू कुटुंब व व्यक्तींसाठी आयटीआर ४ हा अर्ज भरायचा आहे. हे अर्ज आठवडाभरात ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षी १ जुलैला आयटीआर फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती व त्यात बराच विलंबही झाला कारण एकूण चौदा पानांचा तो अर्ज होता व त्यात बँक खात्यांचा व परदेश प्रवासाचा तपशील देणे अपेक्षित होते. या वर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली असून त्यानुसार ३० मार्चला नवीन अर्ज अधिसूचित केले आहेत व ते ३१ जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत. हे अर्ज भरताना पॅन क्रमांक, व्यक्तिगत माहिती व कर भरले त्याची माहिती असेल. टीडीएस आपोआप अर्जात दिसेल. सरकारने नवीन घोषणा केल्या त्यानुसार प्राप्तिकर गणकयंत्रात व्यवस्था केली आहे. तुम्हाला लागू असलेला आयटीआर अर्ज गुंतागुंतीचा असेल तर या गणकयंत्रावर अवलंबून राहणे चुकीचे ठरू शकेल. मूलभूत कर निर्धारण त्यातून कळू शकेल. विवरण पत्र भरताना कराचे दायित्व तपासणे गरजेचे आहे. आयटीआर १, आयटीआर २, आयटीआर २ ए, आयटीआर ३ सुगम (आयटीआर ४ एस) आयटीआर ४, आयटीआर ५, आयटीआर ६ व आयटीआर ७ असे अर्ज जारी केले आहेत. आयटीआर ५ हा पोचपावतीचा फॉर्म आहे. पन्नास लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, मालकीचे विमान, याट किंवा किमती दागिने असलेल्यांना आता नवीन आयटीआर अर्ज भरावा लागेल.