News Flash

देशात १२ तासांत वाढले २४० करोना रुग्ण, एकूण संख्या १६३७ वर

देशाची चिंता वाढवणारी बातमी

संग्रहित छायाचित्र

देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.

देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 1:54 pm

Web Title: increase of 240 covid19 cases in the last 12 hours total number of positive cases rise to 1637 in india scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनने शोधली ब्लड थेरपी, करोना मुक्त रुग्णाचं रक्त वापरुन पाच करोनाग्रस्तांचे वाचवले प्राण
2 Video: पोलीस आहेत की हैवान? व्हिडीओ बघाल तर तुम्हालाही प्रश्न पडेल
3 Coronavirus: रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचं मिशन केलं पूर्ण
Just Now!
X