29 November 2020

News Flash

भारताची आता चीनच्या भूमीत जाऊन चर्चा; भारतीय लष्करानंच दिली माहिती

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर बैठक

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूभागावर दावा सांगत घुसखोरी केली. त्यामुळे मागच्या दोन महिन्यांपासून या भागामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होता. आता तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतंर्गत चिनी सैन्याचे माघारी फिरणे सुरु आहे. १९६२ साली भारत-चीन युद्ध झाले, त्यावर्षी सुद्धा या भागात अशीच स्थिती होती. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. ( फोटो सौजन्य - Express archive)

आठवडाभरापूर्वी उडालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये आता चर्चा होत आहे. भारतीय लष्करानंच यासंबंधी माहिती दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सीमापार चीनच्या भूमीत होत आहे.

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मागच्या सोमवारी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनची मुजोरी समोर आली होती. या संघर्षात चीनचीही मोठी जिवीतहानी झाली होती. तसेच भारतातही चीनविरोधी लाट उसळली होती. आता दोन्ही देशांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. त्यात म्हटलंय की, “भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 11:42 am

Web Title: india china to hold corps commander level meeting at moldo on the chinese side of the lac pkd 81
टॅग China,India China
Next Stories
1 नेपाळ बदलणार नागरिकत्व कायदा; भारतीय तरुणींना बसणार फटका
2 चीनसोबत तणाव असतानाच पाकिस्तानकडूनही आगळीक; गोळीबारात एक भारतीय जवान शहीद
3 गोव्यामध्ये करोनाचा पहिला बळी
Just Now!
X