News Flash

करोना संकटातून देश इतर देशांच्या तुलनेत वेगाने बाहेर येत आहे – नक्वी

सहा प्राणवायू प्रकल्पांपैकी रॅडिको खेतानच्या प्राणवायू प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले,

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर भूमिकेमुळे भारत इतर देशांच्या तुलनेत करोनातून वेगाने बाहेर  येत आहे, असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे.

अल्पसंख्याक कामकाज मंत्री असलेल्या नक्वी यांनी सांगितले, की मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने करोनाचा कणखरपणे मुकाबला केला असून त्यांनी केलेल्या कामाची चांगली फलश्रुती निर्माण झाली.  एकूण १५०० प्राणवायू प्रकल्प देशात पीएम केअर निधीतून बसवण्यात आले आहेत.

सहा प्राणवायू प्रकल्पांपैकी रॅडिको खेतानच्या प्राणवायू प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले, की रामपूरमधील विलासपूर येथे हा प्रकल्प सुरू करण्यात येत असून एकूण सहा प्रकल्पांची क्षमता ताशी २० घनमीटर प्राणवायू निर्मितीची असणार आहे. रामपूरमधील बिलासपूर, कानपूरमधील बिलहौर, भगवंतपूर येथील प्रयागराज, महोबा, मांझानपूरमधील कौशंबी तर माणिकपूर मधील चित्रकूट येथे हे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 12:47 am

Web Title: india coming out of covid more strongly than many nations due to pm s efforts naqvi zws 70
Next Stories
1 काळ्या पैशांबाबत भारतातील उपाययोजनांचा आढावा लांबणीवर
2 अमेरिकेतील पोर्टलँडमध्ये गोळीबारात २ ठार, ७ जखमी
3 “नेते, मंत्री आणि पत्रकारांचे फोन टॅप…”; भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनंतर खळबळ
Just Now!
X