News Flash

देशातील मृतांचा आकडा चिंता वाढवणारा!; मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद

एका महिन्यात १.१४ लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू

देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मृत्यूदर वाढल्याचं दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ५८,४३१ जणांचा मृ्त्यू झाला. तेव्हा मृत्यूदर १.०६ टक्के इतका होता. मात्र पुढच्या १४ दिवसात म्हणजे १६ मे ते २९ मे दरम्यान हा मृत्यूदर १.७३ टक्के नोंदवला गेला आहे. या कालावधीत ५५,६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. मे २०२१ या महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद केली गेली आहे. १.१४ लाख लोकांनी करोनामुळे जीव गमावला आहे. मे महिन्यात दर दिवसाला ३ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाल्याचं या आकडेवारीवरून समोर येत आहे. देशातील आतापर्यंतचा मृत्यूदर १.१७ टक्के इतका आहे.

गेल्या पाच महिन्यातील मृत्यूदर टक्केवारी

  • जानेवारी- १.१५ टक्के
  • फेब्रुवारी- ०.७८ टक्के
  • मार्च- ०.५२ टक्के
  • एप्रिल-०.७० टक्के
  • मे- १.३१ टक्के

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूदरही आटोक्यात येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्यूदरही कमी होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

‘जून महिन्यात कोविशिल्डचे १० कोटी डोस मिळतील’; सिरम इन्स्टिट्युटचं केंद्राला पत्र

दिल्लीत रुग्णसंख्येत घट
दिल्लीत रविवारी ९४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या खाली रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ एप्रिलपासून आतापर्यंत सर्वात कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. मागच्या २४ तासात ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील करोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहाव्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. आता ७ जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे.

करोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाले पुरावे

मुंबईतही करोनाचा फैलाव आटोक्यात
मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ६६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ४१४ दिवसांवर पोहोचला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 8:04 pm

Web Title: india death toll is alarming the highest number of death was recorded in may 2021 rmt 84
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘जून महिन्यात कोविशिल्डचे १० कोटी डोस मिळतील’; सिरम इन्स्टिट्युटचं केंद्राला पत्र
2 करोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाले पुरावे
3 उत्तर प्रदेशात लॉकडाउन शिथील; महाराष्ट्रातही होणार का?
Just Now!
X