करोना व्हायरसशी लढा देणाऱ्या जगातील अन्य देशांना वैद्यकीय सहाय्य करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पुढच्या काही आठवडयात ९० पेक्षा जास्त देशांना वैद्यकीय मदत करण्यात येणार आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली. या मदतीमुळे भारताला ११० ते १२० कोटीचा खर्च येणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून भारत आधीच काही देशांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत आहे. ही त्यामध्ये अतिरिक्त मदत असणार आहे.
Covid-19 साथ सुरु झाली तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला होता. शक्य तितक्या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी आणि जयशंकर फोनवरुन संपर्क साधत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पश्चिम आशियाई देशांवर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवैत आणि जॉडर्न या देशांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
आणखी वाचा- करोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं – WHO
परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांच्याकडे योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ६७ देशांपैकी २९ देशांमध्ये वैद्यकीय साहित्य आधीच पाठवण्यात आले आहे अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. वैद्यकीय साहित्य पोहोचवण्यासाठी नौदलाची सुद्धा मदत घेण्यात आली आहे. आयएनएस केसरी या नौदलाच्या युद्धनौकेवरुन मालदीव, मॉरिशेस, सेशेल्स या हिंदी महासागर क्षेत्रातील देशांना मदत पोहोचवण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 4:16 pm