चीनबरोबरच्या संबंधांना भारत अग्रक्रम देत आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी त्यांचे समपदस्थ जनरल चँग वानकुआन यांच्याशी चर्चेच्या वेळी सांगितले.

र्पीकर यांनी सांगितले की, चीनशी मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध असावेत असे भारताला वाटते व त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारत व चीन या दोन देशांच्या संरक्षण मंत्र्यांची शिष्टमंडळासमवेत चर्चा झाली त्यावेळी र्पीकर यांनी भारत चीनबरोबरच्या संबंधांना अग्रक्रम देतो असे सांगितले. चीनचे संरक्षण मंत्री वँग यांनी र्पीकर यांच्या भेटीने दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये सहकार्याचे वातावरण तयार होईल अशी आशा व्यक्त केली. र्पीकर यांनी नंतर चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष जनरल फॅन चँगलाँग यांच्याशी चर्चा केली. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. चिनी लष्कराच्या चेंगडू येथे पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. र्पीकर हे चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांना भेटणार असून दोन्ही देशातील तणावाचे संबंध कमी करण्याच्या मुद्दय़ावर त्यांचा भर राहील. चीनने भारतालगत सीमेवर सुरू केलेली आक्रमक गस्त, काही वेळा केलेली घुसखोरी या मुद्दय़ांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.भारताने अमेरिकी लष्कराला भारतीय लष्करी तळ रसद पुरवठय़ासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे चीन संतप्त झाला असून तो मुद्दा र्पीकर यांच्याशी चर्चेत मांडला जाणार आहे.