अमेरिकेतील नियतकालिकाचा गौप्यस्फोट
भारत गुप्तपणे आण्विक शहर उभारत असून औष्णिक-आण्विक क्षेपणास्त्रे तयार करीत आहे. २०१७ मध्ये हे आण्विक शहर पूर्ण होत असून त्या वेळी ते उपखंडातील सर्वात मोठे लष्करी संकुल असेल व तेथे आण्विक सेंट्रीफ्युजेस तयार केले जाण्याची भीती आहे, असे अमेरिकेच्या एका परराष्ट्र व्यवहार धोरण नियतकालिकाने म्हटले आहे.
कर्नाटकात चल्लाकेरे येथे भारत आण्विक शहर तयार करीत आहे व पाकिस्तान, चीनला धाकात ठेवण्यासाठी ही योजना तयार केली आहे. त्यामुळे भारताची अणुशक्ती वाढणार असल्याचे या नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे.
भारताची आण्विक महत्त्वाकांक्षा घातक असून निवृत्त सरकारी अधिकारी, वॉशिंग्टन व लंडनचे तज्ज्ञ यांच्या मते भारताला संपृक्त युरेनियमचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे भारत हायड्रोजन बॉम्बही बनवू शकतो व त्याला थर्मोन्युक्लियर म्हणजे औष्णिक-आण्विक शस्त्र म्हटले जाते, त्यामुळे भारताकडील अण्वस्त्रे वाढू शकतात. २०१७ मध्ये भारतातील हे आण्विक शहर पूर्ण होत असून तेथे आण्विक सेंट्रीफ्युजेस, प्रयोगशाळा व शस्त्रे, विमानचाचणी व्यवस्था ही सोयीसाधने असतील. भारताच्या शेजारील चीन व पाकिस्तान यांच्यादृष्टीने भारताचे हे कृत्य प्रक्षोभक असून ते दोन्ही देशही प्रतिसादाच्या आधारावर आणखी अण्वस्त्रे तयार करतील. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट’ या संस्थेने म्हटले आहे की, भारताकडे ९० ते ११० अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे १२० अणुबॉम्ब आहेत. चीनकडे २६० अणुबॉम्ब आहेत. या अहवालावर भारत किंवा अमेरिका सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हाईट हाऊसच्या माजी अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे म्हैसूरवर विशेष
करून चल्लाकेरे या गावावर लक्ष
आहे.