बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी अखेर भारतात दाखल झाली आहे. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही राफेल फायटर विमाने तैनात राहतील. युद्धात गेम चेंजर ठरु शकणाऱ्या या विमानामध्ये नेमकं असं काय वेगळं आहे ते या व्हिडीओमधून जाणून घ्या.

राफेल हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचं उत्तम उदहारण आहे. हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीन राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे.