भारतीय-अमेरिकन वंशाचे श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी यांचा अमेरिकेतील काँग्रेशनल निवडणुकीत पराभव झाला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ट्रॉय नेहल्स यांनी त्यांचा पराभव केला. श्रीनिवास राव प्रेस्टॉन कुलकर्णी टेक्सासमधून निवडणूक लढवत होते. नेहल्स यांना ५२ टक्के म्हणजे २ लाख ४ हजार ५३७ मते मिळवली.

कुलकर्णी यांना ४४ टक्के म्हणजे १ लाख ७५ हजार ७३८ मते मिळाली. प्रेस्टॉन कुलकर्णी माजी राजनैतिक अधिकारी आहेत. चौदावर्ष त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली आहे. इराक, इस्रायल, तैवान, रशिया आणि जमैका या देशांमध्ये त्यांनी काम केले आहे.

परराष्ट्र धोरणाचा त्यांना चांगला अनुभव आहे. २०१८ मध्ये टेक्सासच्या २२ व्या जिल्ह्यातच प्रेस्टॉन कुलकर्णी यांचा पीटी ओलसन यांनी निसटत्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. प्रेस्टॉन कुलकर्णी यांचे वडिल वेंकटेश कुलकर्णी हे लेखक आहेत. १९६९ साली ते अमेरिकेत आले.