भारतीय वंशाचे अमेरिकी मेंदूवैज्ञानिक खलील रझाक यांना मेंदूतील प्रक्रियांचे संशोधन करण्यासाठी ८६६,९०२ अमेरिकी डॉलर इतके अनुदान देण्यात आले आहे. मेंदूतील नेमक्या कुठल्या जैविक प्रक्रियांमुळे वयपरत्वे मेंदूचे विकार बळावतात यावर ते संशोधन करीत आहेत. द नॅशनल सायन्स फाउंडेशनने रझाक यांना पाच वर्षांसाठी हे अनुदान दिले असून वयपरत्वे माणसाला फ्रजायइल एक्स सिंड्रोमसारखे विकार कसे होतात याचा उलगडा त्यांच्या संशोधनातून होणार आहे, रझाक हे मूळ चेन्नईचे असून ते कॅलिफोर्निया विद्यापीठात मानसशास्त्राचे व मेंदूविज्ञानाचे सहायक प्राध्यापक आहेत. वयपरत्वे मेंदूची झीज होण्याने जे श्रवणदोष येतात ते टाळता येतात. ध्वनीच्या कंप्रतेतील जलद बदलांमुळे अनेक वृद्धांमुळे श्रवणदोष निर्माण होतात.
रझाक यांच्या प्रयोगशाळेत मेंदू वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजाला कसा प्रतिसाद देतात, याचा अभ्यास केला जातो, वयपरत्वे होणाऱ्या रोगांमुळे या जैविक यंत्रणांवर काय परिणाम होतो हे यात तपासले जाते. त्यामुळे दोन गोष्टीत फरक अनुभवण्याची क्षमता कमी होते. जेव्हा आपण श्रवणयंत्र वापरतो तेव्हा ते आवाज ओळखण्याची क्षमता वाढवित नाहीत फक्त आवाज मोठा करून देतात. मेंदूतील बदलांमुळे आवाज ओळखण्याची क्षमता वृद्धत्वामुळे कमी होते असे रझाक यांचे मत आहे. वयोमानापरत्वे मेंदूतील न्यूरॉनमध्ये कसे बदल होतात याचा अभ्यास करून त्या संशोधनावर आधारित उपचार पद्धती विकसित करता येऊ शकतात. साउंड लोकलायझेशनसाठी ऑडिटरी कॉर्टेक्स या मेंदूच्या भागाने योग्यप्रकारे काम करणे आवश्यक असते, आपण दोन कानांनी ऐकतो पण त्यावर मेंदूत प्रक्रिया करून न्यूरॉन्स त्यांचा एकत्रित मेंदूत आवाजावर कशी प्रक्रिया होते याबाबतचे सध्याचे ज्ञान फारच प्राथमिक आहे. वटवाघळे ही प्रतिध्वनीवरून वाटेतील अडथळे टाळतात पण तरीही ते पाकोळ्या, विंचू, गोम व इतर कीटक यासारखे भक्ष्य ध्वनीच्या माध्यमातून पकडतात, असे त्यांनी सांगितले.