08 March 2021

News Flash

जगातील सगळ्यात उंच ‘बुर्ज खलिफा’मध्ये एका भारतीयाचे २२ फ्लॅट

'बुर्ज खलिफा'त राहण्याची लायकी नाही म्हणून एकदा मित्राने डिवचले होते.

जॉर्ज वी नेरयमपरमपिल हे दुबईतील प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक आहेत.

दुबईतीलच नाही तर जगातील सगळ्याच उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. या इमारतीत एकतरी घर घेण्याचे स्वप्न जगातील अनेक अब्जधिशांचे असेल. गगनचुंबी इमारत आणि गगनाला भिडणा-या या इमारतीमधील घरांच्या किंमती त्यामुळे गडगंज श्रीमंतांचा राबता या बुर्ज खलिफामध्ये असतो. अशा बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट असणे हे देखील एका श्रीमंताच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. पण याच इमारतीत एका भारतीयाचे एक दोन नाही तर तब्बल २२ फ्लॅट आहेत. जॉर्ज वी नेरयमपरमपिल असे या व्यक्तीचे नाव आहे. जॉर्ज हे दुबईतील प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक आहे.
बुर्ज खलिफामध्ये अनेक श्रीमंतांची घरे आहेत पण आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच एकाच व्यक्तीने इतके फ्लॅट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जॉर्ज यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. जॉर्ज यांची काहाणीही तशी प्रेरणादायी आहे. २०१० मध्ये या इमारातीचा भव्य उद्घटान सोहळा होता.  हा सोहळा पाहण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत जॉर्ज गेले होते. ही आलिशान, टोलजंग इमारत पाहून जॉर्ज खुपच थकित झाले. तेव्हा त्यांच्या मित्रांने या इमारतीत राहण्याची तुझी लायकी नाही असे सांगून त्यांची खिल्ली उडवली होती. मित्राची हिच गोष्ट त्यांना खूप लागली आणि त्यानंतर फक्त सहा वर्षांत लागोपाठ व्यवसायातून आलेल्या पैशांची बचत करून त्यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केली.
जॉर्ज हे एलएलसी ग्रुपचे मालक आहे. त्यांचा व्यवसाय हा दुबईत आहे आणि जवळपास १ हजारांहून अधिक कर्मचारी त्यांच्या कंपनीत काम करतात. जॉर्ज हे मुळचे केरळातील आहे. त्यांचे वडिल शेतकरी होते त्यामुळे जॉर्ज हे त्यांना सहकार्य करायचे. १९७६ च्या आसपास ते दुबईला आले. दुबईत त्यांनी एसी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. दुबईत तापमान अधिक असल्याने त्यांच्या व्यवसाय चांगला चालत होता. १९८४ मध्ये त्यांनी दुबईत आपली कंपनी स्थापन केली त्यानंतर प्रॉपर्टी डिलिंगच व्यवसाय देखील सुरु केला. दुबईत जो कोणी येतो तो श्रीमंत होतो हे मी कधीतरी ऐकले होते आणि श्रीमंत होण्याची हिच ओढ मला दुबईत घेऊन आली असेही ते सांगतात. जॉर्ज यांना भारतात यायचे आहे, भारतात त्यांना त्रिवेंद्रमपासून कासारकोड कालवा काढायचा आहे. तसेच अनेक लोकोपयोगी प्रकल्प देखील त्यांना राबवायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 2:25 pm

Web Title: indian businessman owns 22 apartments in burj khalifa
Next Stories
1 रामदेव बाबांच्या जीन्सचा लूक झाला व्हायरल
2 उबेर टॅक्सी चालकाने तरुणीला दिली टॅक्सीतून फेकून देण्याची धमकी
3 अरविंद केजरीवाल म्हणतात, आरएसएस म्हणजे रिलायन्स स्वयंसेवक संघ
Just Now!
X