25 February 2021

News Flash

EVM Hacking : खासगी कामासाठी लंडनमध्ये होतो, कपिल सिब्बल यांचे उत्तर

मला पत्रकार परिषदेला बोलवण्यात आले होते म्हणून मी गेलो होतो असे सिब्बल यांनी म्हटले आहे

कपिल सिब्बल (संग्रहित छायाचित्र)

लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत इव्हीएम हॅकिंग संदर्भातला खुलासा झाला. सय्यद शुजा याच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल होते याचाच अर्थ ही पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती असा आरोप भाजपाने केला आहे. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी स्पष्टीकरण देत आपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. मला या पत्रकार परिषदेत बोलवण्यात आले त्यामुळे मी गेलो होतो असे उत्तर दिले आहे. कार्यक्रमाचे आयोजक आशिष रे यांना मी ओळखतो. त्यांनी मला इमेल करून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या प्रकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हे प्रकरण निवडणुकांशी संबंधित आहे असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

सोमवारी लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत 2014 च्या लोकसभा निवडणुका इव्हीएमद्वारे मॅनेज करण्यात आल्या होत्या. तसेच भाजपा, काँग्रेस, आपसह प्रमुख बारा पक्षांना इव्हीएम घोटाळा ठाऊक आहे असा आरोप करण्यात आला. सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टने हा आरोप केला. मात्र यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी होते आहे. तसेच निवडणूक आयोगानेही हा सगळा प्रकार चुकीचा आहे आणि याची चौकशी व्हावी असे म्हटले आहे. तर भाजपाने ही पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती म्हणूनच तिथे कपिल सिब्बल होते असाही दावा केला आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कपिल सिब्बल यांनी मात्र मला बोलवण्यात आल्याने गेलो होते असे स्पष्टीकरण दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 5:34 pm

Web Title: indian journalists association london president ashish ray told me he has sent invitations to all political parties says kapil sibbal
Next Stories
1 १५ पैशांवाली संस्कृती आम्ही बदलली; मोदींचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल
2 Evm hacking: हॅकरची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजितच: भाजपा
3 आठशे फूट दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेलं ते भारतीय जोडपं होतं नशेत- वैद्यकीय अहवाल
Just Now!
X