News Flash

MI vs RCB सामन्यावर लावला जात होता सट्टा, पोलीस कारवाईत तिघांना अटक

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

आयपीएलच्या तेराव्या हंगामात अबु धाबीत रंगलेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीच्या जोरावर ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण दिल्ली परिसरातील कोटला मुबारकपूर भागात झालेल्या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर रात्री १० वाजून ३३ मिनीटांनी सैनी वस्ती भागातील एका घरावर छापेमारी करण्यात आली. यादरम्यान ३ आरोपी आपल्या फोनवरुन सट्टा स्विकारत होते. आशिष गुप्ता, योगेश आणि हिमांशु रावत अशी या तिन्ही आरोपींची नावं आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५ मोबाईल फोन, ६० आणि २६ हजाराची एंट्री असलेले ३ कॅश रजिस्टर आणि इतर गोष्टी मिळून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींविरोधात Delhi Public Gambling Act अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 7:08 pm

Web Title: indian premier league betting racket busted in delhi 3 nabbed psd 91
Next Stories
1 कांदा बियाणे निर्यातीवर तात्काळ बंदी; केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा
2 “मर्यादा ओलांडू नका”; सोशल मीडिया पोस्टसाठी नोटीस पाठवणाऱ्या पोलिसांना SC ने फटकारलं
3 रशियन लशीची चाचणी कधी सुरु होणार? ऑक्सफर्डच्या लशीचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्या…
Just Now!
X