डॉलरच्या तुलनेत रुपयाची निच्चांकी घसरण सुरूच आहे. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 29 पैशांनी घसरला. परिणामी एका डॉलरसाठी तब्बल 72 रुपये 74 पैसे मोजण्याची वेळ आली. रुपयाच्या घसरणीबरोबर इंधनाचे दरही गगनाला भिडत आहेत. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर याचा थेट परिणाम होत आहे. परिणामी काही दिवसांमध्ये महागाई अजून वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रुपयाची ही विक्रमी पडझड असल्याचं सांगितलं जात असून, पुढे काही दिवसही ही पडझड सुरूच राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सही कोसळायला सुरुवात झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स विक्रमी 509 अंकांनी कोसळला. दोन दिवसांत सुमारे 1000 पडझड शेअर बाजारात झाली आहे.