25 April 2019

News Flash

सेन्सेक्सची दोन दिवसात हजार अंकांनी पडझड, रुपयाही गडगडला

डॉलरच्या तुलनेत रुपया हे आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन बनले आहे.

डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरगुंडी सुरूच आहे. आजही डॉलरसमोर रूपयाने नांगी टाकली असून डॉलरच्या तुलनेत रूपया ७२.६९ वर पोहोचला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरूच आहे. आजही डॉलरसमोर रुपयाने नांगी टाकली असून डॉलरच्या तुलनेत रुपया ७२.६९ वर पोहोचला आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ ची वेस ओलांडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हे आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन बनले आहे. दुसरीकडे रुपयातील विक्रमी घसरण आणि अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी कोसळला. मंगळवारी दुपारी सेन्सेक्स ५०9 अंकानी कोसळला तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ५०९.०४ अंकांनी पडून ३७,४१३.१३ तर निफ्टी १५० अंकांनी घसरून ११.२८७.५० वर बंद झाला. सोमवारीही सेन्सेक्स 464 अंकांनी कोसळला होता, त्यामुळे दोन दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची पडझड जवळपास एक हजार अंकांच्या आसपास झाली आहे.

खनिज तेलाच्या दरवाढीचा विपरित परिणाम डॉलर-रूपयावर झाला आहे. विशेषत: तेल शुद्धीकरणासारख्या आयात कंपन्यांनी डॉलरची खरेदी केल्याने रुपयाचा तळ सोमवारी अधिक खोला गेला होता. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारात रुपया ७२.६७ पर्यंत गटांगळ्या खाल्ल्यानंतर सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत ७२ पैशांनी रोडावत ७२.४५ या नव्या ऐतिहासिक नीचांकावर विसावला. गेल्या आठवड्यातील शेवटचे सत्र वगळता रुपयाची कमकुवतता गेल्या कालावधीत सलग राहिली आहे. रुपयाने २०१८ मध्ये आतापर्यंत १३ टक्क्यांची आपटी अनुभवली आहे.

दरम्यान, सोमवारी सेन्सेक्स ४६७.६५ अंकांच्या घसरणीसह ३७.९२२.१७ आणि निफ्टी १५१.०० अंकांनी कोसळून ११.४३८.१० वर बंद झाला होता.

First Published on September 11, 2018 4:28 pm

Web Title: indian rupee now at 72 69 versus the us dollar