भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांचे फायदे आता दिसून येत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.

२.६ ट्रिलियन डॉलर इतका अवाढव्य असलेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या हत्तीने आता धावण्यास सुरूवात केली असल्याचे आयएमएफचे भारतीय मिशन प्रमुख रानिल साल्गादो यांनी म्हटले. आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, भारत मार्च २०१९ पर्यंत ७.३ टक्के आणि त्यानंतर ७.५ टक्के वेगाने विकास करेल. जागतिक वाढीत भारताचा १५ टक्के हिस्सा असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

एका वार्षिक अहवालानुसार साल्गादो म्हणाले की, परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) प्रकरणी एकूण जागतिक वाढीत भारताचा १५ टक्के हिस्सा असेल. पण ट्रेडिंग चीनप्रमाणे नसेल. दीर्घ काळापर्यंत जागतिक वाढीचा मुख्य स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जाते.

पुढील तीन दशके किंवा त्यापेक्षाही अधिक भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्वाचा स्त्रोत असेल. तीन दशकात भारत तिथे असेल जिथे काही काळापर्यंत चीनने आपले स्थान निर्माण केले होते, असेही त्यांनी म्हटले.