प्रवासादरम्यान अनेक किस्से होत असतात. एक अनोखा किस्सा इंडिगोने दिल्ली ते इस्तांबुल प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत घडला. इंडिगोच्या या विमानातील प्रवाशांच सामानच दिल्लीत विसरल्याचा प्रकार घडला. 15 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. दिल्लीहून इस्तांबुलला जाणाऱ्या या विमानात तब्बल 130 प्रवासी प्रवास करत होते ज्यांचं सामान दिल्ली इंडिगो हे विमानात ठेवण्याचंच विसरून गेले. त्यानंतर प्रवाशांनी सोशल मीडिवरून आपला संताप व्यक्त केला आहे. यानंतर सोशल मीडियावर #shameonindigo हा हॅशटॅग सुरू करण्यात आला.

या विमानातून प्रवास करणाऱ्या चिन्मय दाबके यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. इंडिगोचे विमान 6E हे दिल्लीतून इस्तांबुल येथे पोहोचले. त्यानंतर जेव्हा आम्ही सामानाच्या बेल्टकडे थांबलो तेव्हा आपला त्यावर एक पेपर मिळाला. इंडिगो प्रवाशांचे सामान विमानात भरणे विसरले होते. एकाही प्रवाशाला त्याचे सामान मिळाले नाही. इंडिगो असे कसे करू शकते. माझ्या आईवडिलांची औषधे लगेज बॅगमध्ये होते. ते डायबिटिसचे रूग्ण आहेत. या विमानात असेही अनेक प्रवासी आहेत ज्यांची कनेक्टिंग फ्लाईटदेखील आहे. आपल्या सामानाशिवाय ते पुढे कसे जातील, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

तर इंडिगोकडून असा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. 8 सप्टेंबर रोजीही इंडिगो प्रवाशांचे सामान विमानात लोड करणे विसरले होते. असे ट्विट मनाली अग्रवाल यांनी केलं आहे.