26 February 2021

News Flash

Indigoचा ‘समर सेल’, विमान प्रवास अवघ्या 999 रुपयांत

शुक्रवारपर्यंत ऑफरचा लाभ घेता येईल, 10 लाख तिकिटांची होणार विक्री

(संग्रहित छायाचित्र)

कमी किंमतीत विमान प्रवासाची सेवा पुरवणाऱ्या ‘इंडिगो’ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी समर सेलची घोषणा केली आहे. ‘इंडिगो समर सेल’अंतर्गत देशांतर्गत तिकिटाचे दर केवळ 999 रुपयांपासून सुरू होत आहेत, तर, आंतरराष्ट्रीय तिकिटांचे दर 3 हजार 499 रुपयांपासून सुरू होत आहे.

आजपासून अर्थात 11 जूनपासून हा सेल सुरू झाला असून 14 जूनपर्यंत याचा लाभ घेता येईल. या सेलअंतर्गत तिकिट बुक केल्यास तुम्ही 26 जून ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत प्रवास करु शकतात. या अंतर्गत 10 लाख तिकिटांची विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय इंडसइंड बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तिकिट खरेदी केल्यास 20 टक्क्यांपर्यंत किंवा 2,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकची ऑफरही आहे. या ऑफरसाठी किमान 4 हजार रुपयांची तिकिटं बुक करावी लागतील. तसंच जर आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे तिकिट खरेदी केल्यास 5 टक्के(1 हजार रुपयांपर्यंत) कॅशबॅक मिळेल, यासाठी किमान 6 हजार रुपयांची तिकिटं किंवा एक तिकिट खरेदी करणं आवश्यक आहे, आणि मोबिक्विक या अॅपद्वारे तिकिट बुक केल्यास 15 टक्के (800 रुपये तक) कॅशबॅकची ऑफरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 3:50 pm

Web Title: indigo summer sale starts 10 lakh tickets available sas 89
Next Stories
1 बेपत्ता ‘एएन-३२’ विमानाचे अवशेष सापडले
2 धक्कादायक! चालत्या कारमधून सुनेला ढकलून देत सासू-सासऱ्यांकडून हत्येचा प्रयत्न
3 14 महिन्यांमध्ये 35 हजार कोटींचं कर्ज फेडलं – अनिल अंबानी
Just Now!
X